उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:

मी दहा वर्षांची असताना सुनीताताई माझ्या आयुष्यात आली. मी दुसरीत असताना आम्ही कोथरूडमध्ये राहायला गेलो. आमच्या पलीकडच्या बिल्डींगमध्ये नरूमामाच्या मॅनेजरचा मुलगा आणि त्याचे काही मित्र राहायला होते. घरात काही खास बेत केला की आई नेहमी मला अजितदादा आणि सुनीलदादासाठी डबा देऊन यायला लावायची. मग एक दिवस अजितदादाचं लग्न ठरलं आणि त्याच्या होणा-या बायकोचा फोटो घेऊन नरूमामा आला. आमचा नरूमामा या बाबतीत नेहमी पुढे असतो. मुलगी बघण्यापर्यंतचे कार्यक्रम त्यांनी त्याच्या मॅनेजर साहेबांसाठी केले. त्या फोटोतून सुनीताताईनी माझ्या आयुष्यात पहिला प्रवेश केला. ...
पुढे वाचा. : सुनीताताई