मुक्तछंदातील नीटस, नेटकी आणि नेमक्या ठिकाणी थांबणारी छान कविता. कल्पनाही वेगळीच.


दुडले शब्दाचा अर्थ कळला नाही.

चवदार शब्दांचे घुटके घेत!

वा... वा...


पण वाचता वाचता डोळा लागताच
हा कोसळून गेला धबाधबा
माझी फिरकी घेत.


- पाऊस तुमच्या नकळत पडून गेला, म्हणजे त्याने फिरकी  घेतली, हे कसे?  कळले नाही.


आता
आधी कौलं घालू की वाचन संपवू
इतकाच प्रश्न आहे.

या तुकड्यातील दुसरी ओळ मी अशी वाचली -
आधी कौलं घालावीत की वाचन संपवावं...

एकंदरीत छान कविता. पुढील लेखनाला शुभेच्छा.