हे सदर वाचून फार आनंद वाटला. कवीतांबद्दल मला काही कळत नाही. बहुतेक वेळा कविता वाचायला कंटाळाच येतो. परंतु भाऊसाहेबांची शायरी मात्र भावून गेली (अगदी ते जरी 'पायरी माझी नव्हे' म्हणाले तरी). शेरांना असलेला सहज सोपा नाद, आणि समजायला सोपे शब्द आणि अर्थ यामुळे असेल कदाचित.

असो, मला पट्कन आठवलेला शेर देत आहे.

सन्मानिले वैराग्य आम्ही, शृंगार ही सन्मानिला
अंकावरी येथे रतिच्या, बुद्ध आहे झोपला

आणखी आठवले तर नक्की पाठवीन