प्रतिसादाबद्दल सहर्ष धन्यवाद.
दुडणे हा शब्द दुमडणे चा समानार्थी शब्द म्हणून अनेकदा 'ऐकला' आहे. कित्येकदा तर दैनंदिन संभाषणात (आई, शिक्षक, मित्र व इतर काही जणांकडून). शब्दकोशात अर्थ बघण्याची तसदी कधी घेतली नाही; मात्र 'ऐकीव' ज्ञानावर भरवसा ठेवला जाऊन वापर होतच राहिला. खाली महेशरावांनी शब्दकोशाचा संदर्भ दिलेलाच आहे.
एखादा मित्र चहा प्यायला घरी यायचाय म्हणून सगळी तयारी करून त्याची वाट बघत बसतो, तसे पावसाच्या स्वागताची सगळी जय्यत तयारी करून मीही बसलो होतो (तिच्या आठवणीमध्ये गुंगत, कवितांमध्ये रमत, घोट-घोट शब्द पीत.. असे काहीसे
) त्याचे धबाधबा कोसळणेही अपेक्षितच खरे तर! पण हा पठ्ठ्या मात्र माझ्या नकळत माझ्या घरी येऊन जातो, नुसताच येत नाही तर कोसळून जातो आणि मला थांगपत्ताही लागत नाही. जाग आल्यावर हे साहेब येऊन गेले, पत्ताही लागू दिला नाही, हे कळते. (येऊन काय कारनामे करून गेले हा भाग वेगळा! ) म्हणून फिरकी घेऊन (बरेचसे खोडकरपणे, खेळकरपणे 'फजिती करून' या अर्थाने; पण 'फसवून' या नकारात्मक अर्थाने नाही) गेला, असे म्हटले. ती खोडी माझ्यावर कशी बेतली, हे पुढे सांगितले आहेच 
कौले आणि वाचनाबाबतची ओळ तुम्ही वाचलीत तशीची छान वाटतेच आहे. पण 'घालू' आणि 'संपवू' मधून 'मी मलाच' विचारलेला प्रश्न (आत्मसंवाद) अधिक स्पष्टपणे दिसतो आहे, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
प्रतिसादाबाबत सर्वांचेच सहर्ष आभार.