माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
ओरेगावात आल्यावर पहिल्याच आठवड्यात फ़्रीवेवर असताना नवर्याने विचारलं होतं ’तुला माउंट हुड दिसला का?’ ’कोण हा??’ असं वैतागून म्हणणार होते पण नव्या जागी आल्या आल्या जागेवरूनच वाद नको म्हणून फ़क्त ’नाही’ इतकंच म्हटलं..त्याला वाटलं असणार इतके महिन्यांचं प्लानिंग करुन आपण घर बदललं तर या बयेने निदान नव्या जागेची सर्वसाधारण माहिती काढली असेल..आता त्याला कुठे सांगु घर सोडावं लागण्याचा सल आणि किती मोठा दगड मनावर ठेवला होता ते? असो...खरं तर अद्यापही मनाने मी कधीकधी आमच्या स्प्रिंगफ़िल्डच्या घरात असते त्यामुळे इथे यायचं पक्कं ठरलं तेव्हा नव्या जागेची ...