माझ्या माहितीप्रमाणे मिलिंद फणसे यांनी दिलेल्या अभंगातली तिसरी ओळ (महापूरे ....वाचती) या अभंगाचा भाग नसून पुढच्या अभंगाचा भाग आहे ज्याची चौथी (शेवटची) ओळ आपल्या अभंगाच्या शेवटच्या ओळीसारखीच आहे. तो पुढचा अभंग असा : 

नीचपण बरवे देवा । न लागे कोणाचाही हेवा ॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥
येती सिंधूच्या लहरी । नम्र होता जाती दूरी ॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥

 (चू. भू. द्यावी घ्यावी)