संतांची भाषा संस्कृतप्रचुर नव्हती हे दिसतेच आहे.  रामदास वगळता इतर संतांचे काव्य लेखनिकाने किंवा अन्य कुणीतरी शुद्ध करून लिहिले हे सत्यच आहे. तुकारामाच्या अभंगांचे लेखन  संतू जगनाड्याने  केले. अर्थात त्याने भाषेच्या चुका दुरुस्त केल्याच असणार. तर मग, मराठी भाषा संस्कृतप्रचुर कधी झाली? 
हल्लीच्या संस्कृतप्रचुर हिंदी भाषेची निर्मिती लल्लू जी लाल नावाच्या एका गुजराथी माणसाने जवळजवळ एकहाती केली. हिंदीत गद्यलेखनाची सुरुवात या गृहस्थाने केली.  लल्लू जी लाल कलकत्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये उर्दूचे प्राध्यापक होते. दिल्ली आणि मेरठ भागांत बोलली जाणारी हिंदी पायाभूत धरून त्यांतील अरबी-फारसी शब्द काढून टाकून लल्लूजींनी खड़ी बोली(खरी भाषा) नावाची संपूर्ण नवी हिंदी निर्माण केली.
प्रेम सागर(भागवत पुराणाचा दहावा अध्याय)(सन १८१०), राजनीति(हितोपदेश आणि पंचतंत्रावर आधारित)(१८०९) ही त्यांची पुस्तके. त्यांचे सहकारी सादल मिश्रा यांनी  खड़ी बोलीत १८०३ मध्येच नचिकेतावर ग्रंथ लिहिला होता.
मराठी संस्कृतप्रचुर होण्यास कधी सुरुवात झाली असावी?  पेशवाईत?  की छपाईला सुरुवात झाल्यावर? पंतकवींचे तर आहेच पण तंतकवींचे मराठी काव्यही संस्कृतप्रचुर आहे.--अद्वैतुल्लाखान.