'नाहीतरी ज्वारी खातंय् कोण?', 'साखर खाल्ली नाही म्हणून मरत नाही कुणी!' वगैरे... इकडे बळीराजाचा बळी देऊन वाइन, मॅकडोनाल्डचे उखळ पांढरे करायचे कंत्राट आम्ही घेतलंय्.... अशा आकांताला वाटाण्याच्या अक्षतांचा आहेर मिळणार हे नक्की.
राजा शेतकरी बळीराज यावे ।
संघटीत व्हावे अभयाने...
मी बरेच दिवस एक स्वप्न पाहातोय् ... वामनाने बळीराजाला पाताळात धाडले तेव्हा विष्णू बळीराजाचा द्वारपाल झाला होता. तो बळीराजा पुन्हा पाताळातून परतावा व इथे येऊन राज्यावर बसावा. आताच्या मुजोरांना त्याने चौकिदार म्हणूनही ठेऊ नये. देवा मला पाव रे!
कविता भिडली.