आकर्षण येथे हे वाचायला मिळाले:
वेळच नाही........परवाच आम्ही बालपणीच्या सर्व मैत्रिणी एकत्र जमलो होतो. हसणे खिदळ्णे झाले, मजेत जेवणही झाले, ४-५ वाजत आले तशी प्रत्येकीची चुळ्बूळ सुरु झाली.ए चल निघतो ग , आमची कन्यका येइल तिला लगेच क्लासला जायचे असते, किंवा कुणी माझा मुलगा शाळेतुन येइल त्याला खेळायला बाहेर जायचे असते, त्यांच्या कडे मुळी वेळ्च नसतो. वेळ्च नही ..... वेळ्च नाही............. हे पालुपद सध्या प्रत्येकाच्या तोंडात आहे. कुठही सबब सांगायला सोपे जाते. शाळेतल्या लहान मुलापासून याची सुरुवात होते. मुलांना शाळा, घरचा अभ्यास, टी.व्ही. पहाणे यातून मैदानावर मनसोक्त खेळायला ...