पुरवणी :
- ते आसन जे मुक्ती देते. सा विद्या या विमुक्तये---ती विद्या, जी मुक्ती देते.
- प्राणापानौ समेकृत्वा लाभालाभौ जयाजयौ, ततो युद्धाय युज्यस्व,मोक्षं प्राप्नोषि अर्जुन : अर्थात, प्राण आणि अपान यांच्यावर सारखाच जोर देऊन, लाभ-अलाभ, जय-पराजय समान मानून अटीतटीने लढ; तुला मोक्ष मिळणारच, अर्जुना!(लाभ-अलाभ मोजताना अकौंटन्सी मधला 'क्रेडिट व्हॉट गोज आउट' हा नियम लक्षात ठेवावा.)
- प्राण कंठाशी आणून सर्व वृत्तींचा अवरोध केल्यास (तसा तो आधी झालेलाच असतो म्हणा) कुंडलिनी सर्पिणी ब्रह्मरंध्र भेदून बाहेर पडतेच.
- पवन सोसाटे भूवरी : नाद न मावे नभोदरी : डळमळली भुवने सारी : देही मुक्त होतसे.. हा मंत्र जपल्यास वांछित फळ अक्सीर मिळतेच.
- शेवटी, ॐ मुक्तिः, मुक्ति:, मुक्तिः
- शांती, असीम शांती !