पंचांगात ब्रह्मध्वज म्हटलेले आहे. श्रीविष्णूच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, त्या दिवसापासून सूर्यसिद्धांताप्रमाणे कालगणना करण्यात येते. ब्रह्मध्वज उभारणे हे त्या घटनेचे स्मरण करणे होय. गुढीपाडव्याचे दिनी सकाळी अभ्यंगस्नान करून गुढी उभी करावी. ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून गुढीचे पूजन करावे. ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्ट फलप्रद । प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद् गृहे मंगलं कुरू ॥ या मंत्राने गुढीची प्रार्थना करावी, असे सांगितले आहे.
सर्व मनोगतींना नववर्षदिनाच्या शुभेच्छा.