* अतिशय सुंदर लेख लिहिला आहात तुम्ही. मी सुद्धा पिक-अपच्यावेळी हाच अनुभव घेते. कधी कधी खूप भीती पण वाटते; न जाणो गाडी कुठे ठोकली वगैरे तर?? आणि जेव्हा तुम्ही त्यांना गाडी हळू चालवा म्हणून सांगता तेव्हा तर ते ऐकून न ऐकल्यासारखं करतात.

* सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे झोपेत गाडी चालवणे. माझा पिक-अप सकाळी ६:०० वाजता होतो. एखादा ड्राईवर कधीतरी खूप झोपेत असतो आणि तो तशीच पेंगत गाडी चालवत असतो. त्याला बघून मात्र आपली दिवसभराची झोप उडालेली असते. रोज-रोज तक्रार तरी किती करणार?

* <<स्टेअरिंग हातात आले, की ह्यांच्या रक्तात कोणत्या पेशी संचारतात काही कळत नाही.... अगदी कमी प्रमाणात वापरला जाणारा हॉर्न/ब्रेक आणि डावी बाजू, उजवी बाजू, ओव्हरटेक, मिनी रिव्हर्स, ९० डिग्री टर्न, ४५ डिग्री लॅप... हे सगळे आपसूकच होत राहते... मागे बसणारा माणूस सवयीचा असेल तर ठीक, नसेल तर दर १० मिनिटाने, "भाऊ, सावकाश जाऊदे बरंका, घाई नाहीये" हे वाक्य...!>>.......... रोजच्या प्रवासाने हे सगळं सवयीचं होऊन जातं.

* <<कोणाला हसवणे आपल्याला जमत नसेल तरी आपल्याशी बोलताना/वागताना समोरच्याला क्षणभर का होईना प्रसन्न वाटावे, आणि वैताग येऊ नये ही माफक अपेक्षा....>> १००% सहमत.