रवा या शब्दाचा एक अर्थ ढेप (जसे गुळाची ढेप) असा आहे. वाक्यप्रयोग - त्या अंधारलेल्या गोदामात गुळाचे हजारो रवे एकमेकांवर रचून ठेवलेले होते.

मुंगी साखरेचा रवा याचा अर्थ "मुंगीला साखरेचा एक छोटा कणही (गुळाच्या/साखरेच्या) आख्ख्या ढेपेइतका मोठा असतो" असा होतो असे ऐकले आहे.

भावार्थ = आपण लहान  आहोत किंवा सामान्य आहोत ही भावना मनात बाळगली तर आयुष्यात सुखी-समाधानी राहता येते. मोठेपणाच्या फुकाच्या भावनेमुळे आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि समाधान नाहीसे होते.

(येथे मागितलेल्या लहानपणाचा आयुष्यातील बालपणाशी संबंध नाही हे लक्षात येईलच.)

चु.भू.द्या.घ्या.

अवांतर - तुकारामांच्या काळी साखर काळसर रंगाची, खड्यांची आणि कदाचित 'ढेप' स्वरूपातही उपलब्ध असावी.  (तुकारामांचे दुकान होते, त्यांना हे उदाहरण समोरच दिसत असावे. इ. ) आज मिळते ती दाणेदार, शुभ्र साखर फारच अलिकडे मिळू लागली असावी. संशोधन जरूरीचे.