हा कुठला (म्हणजे कुठल्या प्रांतातला) पदार्थ आहे?
पहिल्यांदाच ऐकलंय म्हणून विचारलं.

बाकी लेखातले मुद्दे पटण्याजोगेच आहेत.
लेख वाचून, ह्या बद्दल खरंच आपण काहीच करू शकत नाही का? असा विचार करतोय.
आणि मी ह्याबद्दल थोडासा आशावादी आहे. किमान काही गोष्टी प्रयत्नपूर्वक करता येतील असे वाटते.
जसे, किमान संध्याकाळचे जेवण सगळ्यांनी एकत्रच करणे आणि ते सुद्धा टि. व्ही नामक इडियट बॉक्स बंद ठेवून.
आणि जेवणानंतर किमान १५-२० मिनिटे एकत्र बसून (इथेही टी. व्ही. बंद ठेवूनच) गप्पा मारणे, किंवा किमान दिवसभरातल्या गोष्टी शेअर करणे. (घरातल्या प्रत्येकालाच ह्या गप्पा आणि शेअरिंग चे महत्त्व कळले, तर माझ्या मते ह्या बाबतीत कसलेही नियम करायची आवश्यकता भासणार नाही. )

इंटरनेट च्या अतिसवयी बद्दल सहमत आहे.
(काल माझा लॅपटॉप दुरुस्तीला दिला होता, तर सबंध दिवस झोपेत गेला, पण एखादं पुस्तक वाचायचं काही झालं नाही )