विदर्भातला आहे हा पदार्थ. अतिशय चविष्ट

म्हणजे यापुढे उपमा काहीच नाही. कणिक खमंग भाजून मग कांदा, लसणाची फोडणी करायची. मग त्यात ही भाजलेली कणिक घालून त्यात तिखट, मीठ, हळद, साखर चवीप्रमाणे घालायचे. नंतर त्यात गरम पाणी आणि थोडं दही किंवा ताक घालून मस्त दणदणीत वाफ आणायची. मग लिंबांचं गोड लोणचं किंवा तक्कू सोबत खायचं...... अहाहा... इतकं मस्त लागतं ना !!