लेडी नॅन्सी ऍस्टर या अत्यंत फटकळ महिला खासदाराबद्दल हा विनोद सांगितला जातो:

एकदा वादाच्या भरात लेडी नॅन्सींनी चर्चिलना सुनावलेः "विन्सटन, तुम्ही जर माझे पती असता, तर मी तुमच्या चहात विष घातले असते. "

चर्चिलचे उत्तर: "बाई, तुम्ही जर माझ्या पत्नी असता, तर तो चहा मी प्यायलो असतो. "
============================================================
आणखी असाच एक, पुन्हा चर्चिल आणि (बहुधा) लेडी नॅन्सींच्या नावावर खपवला जाणाराः

लेडी नॅन्सी एकदा चर्चिलना म्हणाल्या, "विन्स्टन, तुम्ही प्यायलेले आहात. "
चर्चिलचे उत्तर: "होय, आणि तुम्ही कुरूप आहात. पण उद्या सकाळपर्यंत माझी उतरलेली असेल. "
============================================================
लेडी नॅन्सी ऍस्टर यांच्याबद्दल अधिक माहिती येथे.