उपास, मार आणि उपासमार.. येथे हे वाचायला मिळाले:
विं.दा. गेल्याची बातमी आली. वाईट वाटलं, पण एक समृद्ध आणि यशस्वी जीवन जगलेल्या मनस्वी माणसाला दीर्घायुष्याचं वरदान लाभलं हे समाधान होतं. पाडगांवकरांइतक्या सहजतेने मला विं.दां.च्या खूप काही कविता ऐकायला मिळाल्या नाहीत पण ज्या ऐकल्या त्यांनी अशी पकड घेतली की बस्स.. ’शुभ्र फुलांची ज्वाळा’ ही कॆसेट मला भेट मिळाली होती, त्यातल्या सगळ्याच गझला आम्हाला दोघांनाही इतक्या ...