गझल आवडली,
पण, ऋतूंची असे लिहायला हवे. (तू दीर्घ लिहिल्याने वृत्तात बाध येत नाही, ऋतुंची हे चुकीचे आहे.)
धारायचे- धारण करणे ह्या अर्थाने लिहिला आहे असे वाटते. भाव पोहोचला, पण तरीही कुठेतरी हा शब्द खटकतो.(वैयक्तिक मत)
वाल्मीकी च्या ऐवजी, 'वाल्मीक' असेही चालले असते. किंबहुना तेच वृत्तात बसते.
जर 'वाल्मीकी' ('क' ला वेलांटी) असेच वापरायचे असेल, तर 'वाल्मीकि' असे वापरले पाहिजे.

शेवटचा शेर मनापासून आवडला.