तुम्ही राम-कृष्णाचे जुने/नवे फोटो पाहिले असतील, त्यात त्यांच्या चेहऱ्याभोवती एक पिवळसर प्रकाश/आभा/तेज  जे दाखवतात ना त्यालाच औरा असे म्हणत असावेत.
मी असे ऐकले आहे, की एका विशिष्ट प्रकारच्या कॅमेऱ्यातून, कुठल्याही व्यक्तीच्या भोवती दिसणारा असा सूक्ष्म प्रकाश टिपता येतो. नक्की माहिती नाही.
बाकी, 'देजावू' (ह्याला बहुतेक पूर्वाभास म्हणत असावेत) चा अनुभव अनेकदा आला आहे. एखादी घटना, जशीच्या तशी आपण पूर्वी अनुभवली होती, असे ती घटना घडत असताना वाटणे म्हणजे देजावू (हा बहुतेक स्पॅनिश शब्द आहे)
जशीच्या तशी, म्हणजे अक्षरशः जशीच्या तशी. तीच जागा, तीच वेळ, समोर बसलेली/ल्या व्यक्ती ती/त्याच, त्यांचे कपडे वगैरेही तसेच, बोलल्या जाणाऱ्या वाक्यातही काडीमात्र फरक नाही.