डॉ चोरघडे यांचे अडगुलं मडगुलं या नावाचे वाचकांना आवडू शकेल असे पुस्तक आहे याची अजिबात कल्पना नव्हती. आता मिळवून वाचायला हवे.
विश्वनाथ खैरे यांचे याच नावाचे एक पुस्तक आहे. तमिळमधले अनेक शब्द विकसित होत होत मराठी भाषेत कसे आले हे पटवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा भाषावैज्ञानिक विषयावरचे ते पुस्तक आहे. या 'अडगुलं मडगुलं'ला महाराष्ट्र सरकारचा १९८१-८२ चा 'भाषाशास्त्र व व्याकरण" विभागातला उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. असले वैचारिक पुस्तक सर्वसाधारण वाचकाला सहज आवडू शकेल असे, अर्थात नाही.-अद्वैतुल्लाखान