हा अभंग शिकवताना आमच्या शिक्षकांनी विसूनाना म्हणतात तसाच अर्थ सांगितला होता.

रवा म्हणजे ढेप. पश्चिम महाराष्ट्रात आजही गुळाचे रवे (ढेपी) असे म्हटले जाते. तुकारामांच्या काळात जी साखर होती ती आजच्यासारखी बारीक व यंत्रनिर्मित नव्हती. ती खडीसाखरेहून लहान असे. आता त्याचा मोठा खडा म्हणजे जणू मुंगीसाठी साखरेची ढेपच. मुंगी हा लहान जीव आहे तर तिला साखरेची ढेप आणि ऐरावतासारखे चौदा रत्नांमधील महारत्न असून त्याला मात्र अंकुशाचा मार. कारण 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' म्हणून आपल्याला मोठेपणापेक्षा लहानपणच मिळावे.