इंट्युशन म्हणजे पूर्वाभास नव्हे. इंट्युशन म्हणजे पुढे घडणाऱ्या गोष्टिंची चाहूल. (पण, हा अर्थ पण अर्धवट आहे. )
काही वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये 'स्पिकिंग ट्री' मध्ये ह्याविषयी एक चांगला लेख होता.
इंट्युशनची दुसरी बाजू म्हणजे इंस्टिंक्ट. इंट्युशन नेहेमीच बरोबर असतात तर इंस्टिंक्ट नेहेमी चुकिचे. आणि ह्या दोन्हीच्या मधली रेष म्हणजे पर्फेक्ट लॉजिकल माईंड. आपण दर वेळेस सगळे निर्णय लॉजिकली घेत नसतो. बऱ्याचवेळा आपल्याला तसं 'वाटतं' म्हणून आपण तसं करतो. हे जे 'वाटणं' आहे ते म्हणजे इंट्युशन किंवा इंस्टिंक्ट. मग आता हे इंट्युशन आहे कि इंस्टिंक्ट हे कसं कळणार? तर, एखादी गोष्ट केल्यानंतर ती खरोखरच आपल्या सदसदविवेक बुद्धीला पटली आहे का? जर पटली असेल तर इट वाज इंट्युशन, नाहितर इंस्टिंक्ट. आता आपण केलेली गोष्ट ही आपल्या सदसदविवेकबुद्धीला पटली आहे हे कसं कळणार? तर अंतरमनाचा कौल घेतल्याने. इथून पुढे हा विषय अध्यात्मात जातो हे सूज्ञांना सांगणे न लगे. एकदा का अंतरमनाचा कौल घेण्याची कला अवगत झाली की 'विचार न करता बरोबर निर्णय घेता येतात'