या रचनेला विडंबन म्हणावेसे मला वाटत नाही. या कवितेत वर्णिलेली स्थिती ही साधारणतः साधकाच्या वाटचालीतील एक टप्पा आहे.  ती संचित दाखविते. त्यामुळे या कवितेची बैठक वेगळी आहे. म्हणून ती एक स्वतंत्र रचना झाली आहे. किंबहुना, आपला तो अनुभव वाटतो... आत्मप्रचितीप्रमाणे. अंबासकर यांनी काव्यात्मक बैठक घेतली आहे. अबोलीला रंग आहे, वास नाही तर मोगऱ्याला रंग नाही, दरवळ आहे; कांही तरी होतंय असं वाटतं पण काय होतेय हे जगाला सांगता येत नाही, आकाशाची अशीच स्थिती झाली आहे. एकंदरीत, मनाचा कोंडमारा इथे व्यक्त होतो. आपल्या कवितेत भान आहे, उन्मनीपर्यंतची वाटचाल आहे, कोंडमारा नाही. असो. एक स्वतंत्र रचना म्हणून आपली कविता सुरेख आहे. शुभेच्छा!