टवका हा शब्द जवळजवळ सर्वांना माहित आहे. रवका हा शब्द काहींच्या बोलीत येतो. (किंबहुना येत असे.)
टवका हा शब्द मुळात 'रवका' असावा असे वाटते. रव्याचा (ढेपेचा) तुकडा तो रवका. गुळाची ढेप फोडताना तिचे उडणारे तुकडे आठवावेत. (तसेच रपका हा शब्द मूठभर चिखलाबद्दल (तत्सम पदार्थांबद्दल) वापरला जातो.)