१) "सहजीवनाचा सरळ आणि साधा उपाय श्रम-विभागणी सुचवला आहे. अगदी मान्य. पण ही 'श्रम-विभागणी' पुरुष व स्त्री दोघांनीही अर्थाजन करणे व दोघांनीही घर काम करणे अशी का होउ शकत नाही?"
श्रम-विभागणी मंजूर झाल्यावर ती कशी करायची हे तुमचे कौशल्य आहे आणि ती तुमच्या दोघातल्या समन्वयावर अवलंबून आहे. मी दोघांनी घर काम करू नये किंवा अर्थार्जन करू नये असं म्हंटलं नाही. खरं तर तुम्ही जर क्षण-क्षण जगत असाल तर प्राप्त परिस्थितीत जे काय सहज असेल ते करणे सगळ्यात श्रेयस ठरते. अर्थात असं जगायचं म्हणजे तुम्हाला आपण कोण आहोत (स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत) हे न बघता प्रसंग काय आहे ते बघण्याची सवय करावी लागते; मग तुम्ही व्यक्तीमत्वाकडून निर्वैयक्तिकतेकडे येता आणि जीवनात लगेचच मजा यायला लागते.
२) "हा पूर्ण लेख फक्त मध्यम वर्गीयांनाच लागू आहे हे नक्की. कारण गरीब घरातून तर बायकांना अर्थाजन तसेच घरकाम दोन्हिही करावेच लागते. तिथे पुरुष एक तर पैसे मिळवत नहित आणि मिळवलेच तर व्यसनात उडवतात."
असं नाही! हा लेख जो वाचतोय त्याला , जर त्याला माझं पटलं तर उपयोगी होऊ शकतो. गरीबी हटवणे माझं काम नाही, ते राज्यकर्त्यांचं काम आहे. मी तुम्हाला या लेखमालेत तुमच्या स्वरूपा विषयी सांगतोय, तुम्ही ही संपूर्ण लेखमाला वाचा मग तुम्हाला वैयक्तीक प्रश्न सहज सोडवता येतील.
संजय