१.) एक माणूस एका रिक्शावाल्याला म्हणतो काय हो शनिवार वाड्याला जाणार का..?? त्यावर तो रिक्शावाला म्हणतो.. हो जाणार.. की

 त्यावर पहिला माणूस त्याला म्हणतो मग जा की..

२.) एकदा एक हत्ती  आणि मुंगी पोहायला जातात.. पण फक्त हत्तीच पोहू शकतो.. असे का??

कारण मुंगी कडे स्विमिंग कॉस्चुम नसतो.

३.) एक हत्ती विहिरीत पडतो.. तो बाहेर कसा येईल..?

...

...

...

ओला होऊन.

४.) एकदा एक हत्ती आणि मुंगी असे जात असतात तर हत्तीला साखर मिळते तो त्यातली थोडी साखर मुंगीला देतो खायला पण ती खात नाही.. का??

..

कारण तिला diabetes झालेला असतो.

५.) दोन मग ( चहा/दूध/कॉफी प्यायचा मग हो..) एकमेकांना भेटतात तर पहिला मग दुसऱ्या मगाला काय म्हणेल..??

उत्तरः काय मग..??