एका प्रकारातील अनुभूतींचे भौतिक विज्ञानाच्या मदतीने स्पष्टीकरण देता येणे शक्य होते तर दुसऱ्या प्रकारातील अनुभूती या वैयक्तिक (आध्यात्मिक) स्वरूपाच्या असतात. भौतिक विज्ञान तिथपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. 'आम्ही ईश्वर पाहिला' असे सांगणारे सारेच संत सामान्य जनांची दिशाभूल करणार नाहीत, हे नक्की. माइण्ड या एकाच पट्टीने मोजमाप न करता अंतःकरण चतुष्टय (मन, बुद्धी, चित्त, अहंकार) चा विचार अध्यात्म करते. (न्यू वे आश्रम, लोणावळा येथे स्वामी विज्ञानानंद यांनी स्थापन केलेल्या संस्थेत याविषयी संशोधन चालू असते, असे ऐकले आहे.त्या संस्थेचे मासिक पत्रकही निघते.)