अजिबात चुकलेले नाही. किंबहुना या प्रसंगातील माझा दृष्टिकोनही मला बरोबर वाटतो. परंतु अनेकवेळा अनाहुतपणे किंवा समस्येची नीट माहिती न करून घेता आपण सल्ला देऊन टाकतो. अगदी आपलेच कोणी चांगल्या माहितीतले आहे असे समजा आणि त्याने त्याचे दुःख आपल्यापाशी मोकळे केलेय. कधी कधी आपण त्याला मदत करू शकत असतो पण करतोच असे नाही. त्यामागे आपले काही वैयक्तिक कटू  अनुभव असतात, काही वेळा लोकांनी गैरफायदा घेतलेला असतो. मग आपण सरसकट सगळ्यांनाच एकाच तराजूत तोलून मोकळे होतो. आणि फुकटचा उपदेश-सल्ला मात्र पाजतो. हे करता नये असे वाटते. आपल्या प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.