मुळात अडचण समजून घ्यायला हवी, त्यासाठी तेवढा वेळ हवा. शिवाय, ती समजली
तरी तिचे समाधान- निराकरण करणे आपल्याला शक्य असेलच असे नाही . तेव्हा ही
उपदेशाची पोकळ ढोंगबाजी बंद. असे ठरवून मी त्या संवादावर पडदा टाकला खरा पण
मनात कुठेतरी स्वत:च्या दुट्टपीपणाची - दांभिकपणाची टोचणी लागली . आज
बारा-तेरा वर्षे झाली तरीही ती सलतेच आहे
असे प्रश्न ज्यांना छळतात, त्यांना आयुष्यभर अशी टोचणी लागून राहाते.
आपण काय करू शकतो?
असे सल्ले देणे टाळू शकतो.
(अवांतरः शक्य तितकी आर्थिक मदत करू शकतो. (भीक देऊन नव्हे) - ही मदत योग्य हातांत पोचली आहे की नाही याची वेगळी टोचणी लागणार नसेल तर. घरातले जुने कपडे, जुनी भांडी - त्यांचे पुढे काय होईल याचा विचार न करता - अशा लोकांना देऊ शकतो. दिवाळीसारख्यासणांत घरी गरज नसताना तयार केलेले - आणि आहेत म्हणून विनाकारण खाल्ले जाणारे फराळाचे पदार्थ व्यवस्थित पॅक करून अशा लोकांपर्यंतपोचवू शकतो. आणि कधीतरी हे सगळे बदलेल, 'वो सुबह कभी तो आयेगी' अशी आशा करू शकतो!)