विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की मानवाच्या विचारांच्या प्रकारानुसार व तीव्रतेनुसार काही विशिष्ट प्रकारची किरणे/लहरी डोक्याबाहेर कमी अधिक प्रमाणात पडत असतात. त्या अदृश्य प्रकाशकिरणांना औरा म्हणतात.

माझ्या माहितीप्रमाणें विज्ञानानें अद्याप तरी असें काहींही सिद्ध केलेलें नाहीं. केवळ पाश्चात्य म्हणतात म्हणून तें बरोबर असें सर्व बुद्धिप्रामाण्यवादी मान्य करणार नाहींत. कृपया संदर्भ द्यावा. पाश्चात्य देशांतही भरपूर अंधविश्वास आणि बुवाबाजी तसेंच असें अविश्वासार्ह साहित्य प्रकाशित करणारीं भरपूर प्रकाशनें आहेत.

विचार जेवढे तीव्र तेवढे जास्त वेळ ते वातावरणात साठून राहातात व तितक्या दूर प्रवास करतात, असे आपण गृहित धरले तर ते विचार एखाद्या संवेदनक्षम माणसाच्या मेंदूत प्रवेश करून अशा प्रकारे त्याला काहितरी पूर्वाभासात्मक सूचना देवू शकतात. ते विचार स्विकारण्याकरता त्यावेळी मेंदू विशिष्ट स्थितीमध्ये ट्यून्ड असला पाहिजे. (जसे टेलीकम्यूनिकेशन मध्ये रेडियो लहरी प्रक्षेपीत केल्या जावून त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सी- वारंवारिता असलेल्या रेडीयो स्टेशन वर ट्यून होवून ऐकायला मिळतात त्याचप्रमाणे. )

तर मग या लहरी प्रयोगानें भौतिकशास्त्रीय साधनांद्वारा कां पकडल्या जात नाहींत.

मग याद्वारे टेलिपथीचा ही उलगडा होतो, मनकवडेपणाचाही आणि स्वप्नांचाही अन बाधा/पुनर्जन्म या गोष्टींचाही!!!

प्रयोगानें जर सिध करतां येत नसेल परंतु गणितानें वा तर्कानें सिद्ध करतां येत असेल तर ती उपपत्ती परंतु प्रयोगानें, गणितानें वा तर्कानें सिद्ध करतां येत नसेल तर हें केवळ स्वप्नरंजन वा अंधविश्वास आहे असें म्हणतां येईल. याचाच फायदा घेऊन बुवाबाजी चालते.

माईंड कम्युनिकेशन
हें विज्ञानसाहित्यांत वापरलें गेलें आहे. उदा. आयझॅक ऍसिमॉव्हनें फाउंडेशन मालिकेंत म्यूल हें मानवापासूनउत्क्रांत झालेलें पात्र दाखवलें आहे. तसेंच 'पे एनी प्राईस' या कादंबरीत विविध माणसांना दोनतीन पातळ्यांवर संमोहित करून त्यांच्याकडून संमोहित अवस्थेंत असतांना विविध गुन्हे सी आय ए चे एजंट करून घेतात. परंतु या दोन्ही विज्ञानकादंबऱ्या आहेत, शास्त्रीय सत्य नाहीं याचें भान ठेव्वलें पाहिएज.

सुधीर कांदळकर