सुमीत रेखी साहेब, अनुभव वाचून तुम्ही काय परिस्थितीतून गेला असाल आणि तुमची मानसिक अवस्था त्या वेळी काय झाली असेल याची कल्पना येऊन अंगावर अक्षरशः काटा आला. वाचत असताना मी तुमच्याबरोबर कुठे तरी उपस्थित असून सगळं काही स्वतः पाहतोय असं वाटण्याइतकं प्रभावीपणे तुम्ही लिहिलंत. त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक.

वास्तवीक एन आय सी यू मध्ये प्रिमॅचुअर बॉर्न मुलांना ठेवतात या शब्दशः माहितीव्यतिरिक्त मला बाकी काहीच माहित नव्हतं. तुमच्या लढाईत तुम्ही शेवटी यशस्वी झालाच पाहिजेत असं लेखाचा शेवट होईपर्यंत सारखं मनात वाटत राहिलं आणि तुम्ही लढाईत यशस्वी झालात हे वाचून जो आनंद झाला तो शब्दात सांगता येण्यासारखा नाही. या तुमच्या लेखातून खरोखरच खूपकाही शिकण्यासारखं आहे.

तुमच्या शूरवीर राजकुमाराला आणि तुम्हा कणखर आईबाबांना माझ्याकडून भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा.

धन्यवाद, दिलसे