तुमचा अनुभव वाचला. तुमच्या आईंचे कौतुक की त्यांना आधीच्या प्रसंगात मृत व्यक्तीच्या आत्म्यास कशाने बरे वाटेल हे कळले व दुसऱ्या प्रसंगात स्वतःचे वेळी त्यांनी स्वयंनिर्णय घेतला. 
ही ज्याच्या त्याच्या श्रद्धेची, विश्वासाची व मर्जीची बाब आहे असे मला वाटते. काहीजण धर्मानुसार दानधर्मही करतात, पिंडदान विधीही करतात व विधायक कार्यासाठी मृत व्यक्तीचे नावाने दानही देतात. पिंडदानामागे जे सूक्ष्म शास्त्र दडलेले आहे त्यानुसार पिंडदान यथोचित वाटते. पण जर एखाद्याला त्यात विश्वास नसेल तर न करेना का! इथे सर्व प्रकारची माणसे पाहायला मिळतात हे मात्र खरे! जसे तुमच्या आईने निक्षून सांगितले की काही करायचे नाही, तितक्याच निक्षून काही आया आपल्या मुलांना मरणोपरान्त आपले सर्व विधीवार नीट करायला सांगतात. काहीजण तर त्यासाठी वेगळे पैसे काढून ठेवतात. शेवटी, म्हटले त्याप्रमाणे हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे हे मात्र खरे!!