कोणतीही एक गोष्ट सार्वकालिक बरोबर किंवा चूक नसते. तेव्हा ज्याला जे रुचेल ते करावे, दुसर्याला शक्यतो न दुखावता.
पिंडदान करून मृताच्या आत्म्याला, किंवा त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे मागे राहिलेल्याला शांती मिळत असेल, तर मिळेनाका! कुणास पिंडदान न केल्याने शांती मिळत असेल, तर त्याने त्या प्रकारे मिळवावी. मात्र दुसर्याला 'तू उधळपट्टी करतो आहेस' वगैरे म्हणून बोल लावू नये. त्याचे स्वातंत्र्यत्याला!