काय नुसते ऐकता; प्रतिसाद द्या!
हातची राखून द्या; पण दाद द्या !
वा नामानिराळे बुवा,
पहिला शेर फारच महत्त्वाचा आहे हो! अगदी मनातले बोललात!!
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही —
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या!
वा. किती सात्त्विक विचार आहे! खूप आवडला.
व्हायचे सैतान हे डोके रिते—
त्यास काही छंद लावा, नाद द्या!
ह्या शेरातही अगदी पटण्यासारखेच लिहिले आहे.
आपला
(सहमत) प्रवासी