२साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी, रामाची जानकी,पगडा फू बाई पगडा फू. (हे मंगळागौरीचे का?)
३नणंदभावजया दोघीजणी, घरात नव्हते दुसरे कोणी, शिंक्यावरचे लोणी खाल्ले कोणी
४. दारातल्या ग तुळशी, तू पानन् पान फुलशी
५.(पहिले शब्द आठवत नाहीत....)कृष्णाजी घाली हात, राधे घाल ग मुखात.
या गाण्यांतून दारी मूळ येण्याची कल्पना नेहमी असते. मूळ येणे किंवा मूळ जाणे म्हणजे बोलावणे करण्यासाठी येणे किंवा जाणे, अथवा बरोबर घेऊन जाण्यासाठी येणे किंवा जाणे. ह्याचाच अर्थ पुढे पुढे 'बुलावा' येणे, काळ येणे असा झाला असावा. मूळ नक्षत्र वाईट समजतात ते त्यासाठीच. मेहूण म्हणून बहिणीलाच मूळ बोलवले अशा अर्थाचा एक श्लोक दासबोधात आहे.