सन्जोप राव, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. अगदी. सल्ला देणे बंद हा मंत्र पाळला. पैशाने केलेली मदत कितपत पोचते याबद्दलची प्रचंड साशंकता जनमानसात आहेच त्यामुळे खायला देणे, कपडेलत्ते -अनाथ आश्रमात जाऊन प्रत्यक्ष मदत करणे हेच पर्याय निवडले. हे चित्र किंचित तरी बदलेलच ही आशा आहेच.
आशुतोश, हो ना. मी नेत नाही म्हटल्यावर त्याचे तेवर बदललेच . उद्या त्याच्या ओळखीतल्या चार मुलांना मी किंवा माझे यजमान नसताना घेऊन आला असता आणि चोरी करून गेला असता तर...
. टोचणी लागली कारण त्याला तू काम करत का नाहीस हे विचारले पण काम मिळेल याची मी सोय केली नाही /करू शकते का, याचा बोलण्या आधी विचार करायला हवा होता. आणि नसियत फॅक्टरी त्या दिवसापासून बंद.
असो. प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद.
शरद कोर्डे, आभारी आहे. नंतर ज्या ज्या वेळी यावर विचार केला तेव्हा हा दुसरा मुद्दा मलाही वाटलाच. कदाचित त्याला असे भीक मागून जगणेच जास्त सहज-सोपे वाटत असेल. कोडगेपणा तर लहानपणीच आलेला. ( ते त्याचे दुर्दैव ) आता ही बाई वीस रुपये देऊन काम कर म्हणतेय हे रुचले नसावे. आणि मी त्याला घरी आणण्याची शक्यता नव्हती. इतका विश्वास टाकणे फार कठीण आहे. ( समाजातील एक टक्का भाग हेही करते आहे. काही उदाहरणे पाहण्यात येतात. )
स्वाती दिनेश, हो गं. कदाचित आधीही कोणी असे त्याला उपदेश केले असतील आणि तो तुम्हीच द्या ना काम, असेच म्हणाला असेल. मग ती व्यक्ती हे शक्य नाही हे जाणवून मागे हटली असणार ( माझ्यासारखीच ). पुन्हा असे कोणी बोलले की त्यालाच धरायचे हे तंत्र त्याने अवलंबले असेल... खरे तर आशुतोश, म्हणतात तसे , काम करण्याची इच्छा असणारा काम शोधतोच. मग त्यासाठी कोणाच्या घरी जाण्याची गरज नाही.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.