ज्याला हवे ते त्याने करावे हे विचार चूक आहेत. भारतीय घटनेनुसार वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पाठपुरावा करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. समाजाला मागे नेणाऱ्या अशा गोष्टींना विरोध करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. 'ज्याला हवे ते त्याने करावे' या आपण लावलेल्या लोकशाहीच्या चुकीच्या अर्थाने समाजाचे अपरिमित नुकसान झाले आहे.