ह्यापैकी कुणालाही भाषांचा इतिहास माहित नसावा म्हणून असली विधान करून आपापले ज्ञान पाझळत आहेत.
असो. दक्षिणेचे चुकले असे म्हणणारे तुम्ही कोण? किंवा हिंदी न येणार्यांचे चुकले हे सांगणारे तुम्ही कोण?
उद्या मराठी भाषेचे पतन करण्यात तुम्ही चुकले असे म्हणाले तर ? मराठी लोकांना मराठीचा स्वाभिमान नाही असे म्हटले तर ?
आहो तुम्ही मराठीचे जतन करू शकत नाही ,तीचा प्रसार करत नाही व ती टिकवू शकत नाही ह्याचे खापर स्वभाषा प्रेमी दाक्षिणात्य लोकांवर फोडतात असे तुम्हाला म्हटले तर? तुमच्या राज्यात मराठीला काय किंमत आहे?? त्यामानाने २५०० वर्षांपासून तमिळ लोक आपली भाषा आणि संस्कृती टिकवून आहेत ह्याचा त्रास होतो का तुम्हाला? आज तमिळ , तेलगू , मल्याळम, कन्नड, बंगाली, पंजाबी ह्या भाषांनी अनेक रोजगार उपलब्ध करून दिले आहेत.त्यांच्या टि. व्ही. वाहिन्या,वृत्तपत्र ,रेडिओ , चित्रपट आणि कलाकार ह्यांची संख्या मराठीपेक्षा अधिक आहे त्यांच्या राज्यात त्यांच्या भाषेत अनेक रोजगार मिळतात मग त्यासाठी जर त्यांची भाषा शिकावी लागत असेल तर स्थानिकांना ती टिकवावीच लागते इतर प्रगत राष्ट्रांमध्येही तसेच आहे युरोपात इंग्लंड सोडून असे किती जण इंग्रजीत बोलतात?? प्रत्येकाने आपल्या भाषेत प्रगती साधली आहे. एक उदाहरण (हेच तमिळ विषयी देखील लागू पडते जी हिंदीपेक्षा अधिक मनोरंजान व प्रसार-ज्ञानासंबंधी रोजगार देते)
टॉलीवुड (आंध्रप्रदेश राज्याचा चित्रपट ) हि भारतातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी आहे, तसेच जगातील सर्वात जास्त चित्रपट निर्मीती करणारा चित्रपट उद्योग आहे.आज आंध्रप्रदेशातील ३७०० हुन अधिक चित्रपट गृहातुन टॉलीवुडचे चित्रपट प्रदर्शित होतात.(भारतातील सर्वात जास्त चित्रपट गृह आंध्र प्रदेशात आहेत.) ह्या चित्रपट सृष्टिने अनेक गिनिज बुक रेकॉर्ड्स प्राप्त केले आहेत.जगातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी होण्याकडे तेलगु सिनेमाची वाटचाल आहे आता मला सांगा ह्यात तेलगू भाषिकांचे काय चुकले? तेलगू मुळे त्यांना रोजगार मिळतो स्थानिकांना काम व सन्मान मिळतो आणि भाषा समृद्ध होतेच.
जर तेच हिंदीचे गोडवे गात बसले तर मग त्यांच्या भाषेचे काय? मराठी लोक ज्याप्रमाणे स्वतःच्या भाषे बाबतीत उदासीन असतात त्याच प्रमाणे सर्वांनी जगावे असे त्यांना का वाटते? प्रत्येकाला आवडी निवडी असू शकतात. तुम्ही आनंदाने हिंदीत बोलाल किंवा हिंदीचा प्रसार देखील कराल म्हणून काय सर्वांनी तेच करावे असे काही आहे का? मराठी माणसाचे वागणे ते योग्य आणि बाकीचे ते चुकिचे वारे वा , मराठी माणसाची मानसिकता काय आहे ह्याचे प्रदर्शन सध्या समाजात दिसतय.
स्वतःला स्वतःची भाषा संस्कृती, शासन , स्थानिक उद्योगधंदे रोजगार टिकवता येत नाही आणि इतरांनी केले तर त्यांना देशप्रेम नाही ते द्वेष्टे आहेत असा सहज तर्क काढून मोकळे. राजकारणी काय आणि सामान्य माणूस काय सर्वच जण न्युनगंडामुळे असले तर्क वितर्क लाऊन वाट्टेल ते विधान करतात. कुणी काय करावे आणि काय करू नये हा अधिकार सर्वस्वी त्याला असतो कुणी कुणावर कोणतीही गोष्ट लादणे म्हणजे गुलामगिरीच होय. आणि ती लादून घेणार्याची लाचारीच होय. स्वतःहून कुणी कुठल्या गोष्टीचा स्विकार करत असेल तरच त्या गोष्टीचा विजय असतो. जबरदस्ती लादलेली कोणतीच गोष्ट दिर्घकाळ टिकत नसते. आपण स्वतंत्र भारतात राहतो त्यामुळे कुणी कोणत्या भाषेत बोलावे किंवा बोलू नये ह्याविषयी कोणतीच जबरदस्ती (बळजबरी) नसावी आणि संविधानाने देखील तेच मान्य केले आहे. हिंदीतच बोला असे कुठेही नमूद केलेले नाही किंवा जे हिंदी ऐवजी इंग्रजीत बोलतील ते चुकले असेही कायदा म्हणत नाही. असो.