'विज्ञान' हा शासनाचा धर्म आहे काय?
आपापल्या मताचे, धर्माचे आणि रुढींचे पालन करणे याचाही अधिकार आहे, दुसर्याच्या अधिकारावर गदा न आणता. त्याच अधिकारात पिंडदान करण्याचे किंवा न करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे.
उलट आपण म्हणता त्याप्रमाणे या  गोष्टीला सरळ विरोध करणे (वरील प्रमाणे एक घाव दोन तुकडे करून) अन्याय कारक आहे. कोणी क्ष व्यक्तीने आपल्या वडिलांसाठी श्रद्धेने पिंडदान केले म्हणू दुसर्या कोणाचे काय गेले? किंबहुना माणुस जो भात खाऊ शकला असता, तो कावळ्याने खाल्ला/ न खाल्ला, या व्यतिरिक्त समाजाचे काय नुकसान झाले? आपल्या अश्या बोलण्यामुळे मात्र जरूर कोणीना कोणी दुखावेल.
तेव्हा आपला या गोष्टीला विरोध असेल, तर तो स्वतःजवळ ठेवा, फारफारतर आपल्या आप्तांना यातील फोलपणा समजावून सांगा. त्यापेक्षा व्यापक प्रमाणात अश्या क्षुल्लक गोष्टीला विरोध करण्याने काय साधणार आहे?
प्रत्येक रुढीचे वैज्ञानिक विश्लेषण करत बसलो तर आपल्याला करण्यासारख्या फार कमी गोष्टी या पृथ्वीतलावर उरतील. हा तर्क ताणत ताणत अश्या एखाद्या प्रश्नापर्यंत पोचतो, की त्याचे उत्तर आपल्याला 'आंतरिक विश्वासाच्या' (रूढ भाषेत श्रद्धा)  जोरावरच देता येते.
PS:-
वरील प्रसंगाचे विश्लेषण 'पिंडदान वगैरे बरोबर असते' असे गृहितक धरून केले तर त्यात एक गंमत लक्षात येते. मुलांना जेवायला वाढल्यावर 'काय आश्चर्य', पिंडाला कावळा शिवला. याचा अर्थ मृत व्यक्तिचाही या गोष्टीवर विश्वास नव्हता. तेव्हा पिंडाला कावळा शिवायची वाट पाहू नये/किंवा पिंडदान करूच नये अशी त्यांची इच्छा असणार. ती पूर्ण झाल्यावार शिवला कावळा ...