किनारा ह्या शब्दाचा अर्थ स्पेसिफिक असा म्हणजे समुद्र अथवा नदीचा काठ हा असला तरी   किनार ह्या स्त्रीलिंगी नामाचा अर्थ मात्र कुठलीही कडा, कड, बाजू, बॉर्डर असा होतो. उदाः हिरव्या साडीस पिवळी किनार ग, रानी लिंबास आला बहार ग.  किंवा नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी ग. कडा हा शब्द सुद्धा स्त्रीलिंगी वापरला तर त्याचाही तोच अर्थ निघतो. उदाः रुपेरी कडा(ढगांची). त्याची कड घेऊन बोलू नकोस (बाज़ू), कुणीकडे चाललास? बाज़ू,दिशा.  बांधाच्या कडेकडेने. कपाच्या किनारीवरची सोनेरी वेलबुट्टी, (कड अथवा रिम).

वरच्या उदाहरणातील बहार हा शब्द देखील उभयलिंगी वापरतात. बहर हा मूळ हिंदी-उर्दू बहार पासून आलेला शब्द वसंत, स्प्रिंग, ह्या अर्थाने वापरतात. आपण भर, बार, पहिला बार, दुसरा बार, (विशेषतः मोसंबीचा) अशा वेगवेगळ्या अर्थांनी बहारची रूपे वापरतो.