माझ्या वडिलांच्यावेळी पण माझे काका-काकी, आणि मुख्य म्हणजे माझी आई होती. त्यामुळे हे करणार होतोच. तोपर्यंत हे करायचे नाही वगैरे विचार डोक्यात नव्हते. हे करतातच एवढे माहित होते. पण वडिलांच्या वेळी जे प्रकार घडले त्यातून आम्ही धडा घेतला. आईने या सगळ्या त्रासातून आम्हाला मुक्त केले. कदाचित वडिलांनी पण हे करू नका म्हणून सांगितले असते. पण ते अचानक गेले. आईच्या वेळी हे केले नाही तरी माझी मावशी आणि माझी काकी होती. त्यांच्या समाधानाखातर उदकशांती केली होती.