रसरंग आणि अमृत अद्यापही चालू आहेत अथवा असावीत असे वाटते.
अमृत अजूनही चालू आहे. मी नुकताच फेब्रुवारीचा अंक फूटपाथवर पाहिला.
अमृतचा छपाईचा दर्जा चांगला नव्हता. वर्तमानपत्राचा असणारा कागदच मासिकासाठी वापरला जाई. त्यामुळे आजकाळच्या रंगीत आणि गुळगुळीत कागदासमोर "अमृत" ची गुणवत्त्ता असुनही दर्जा टिकणारा नव्हता असेच खेदाने नमुद करावे लागेल.
मलाही तसेच वाटते. मी अमृतची वर्गणी भरून एक वर्ष उलटले तरीही मला एकही अंक मिळाला नव्हता. अनेकदा मनिऑर्डरच्या पावत्यांची छायाप्रत संपादकांच्या नावे नाशिकच्या पत्त्यावर पाठवून दमलो. शेवटी त्यांच्या एका निवेदनात वितरण व्यवस्थापक असा शब्द वाचला नि पावतीची एक प्रत त्यांना पाठविली, तेव्हा कुठे वर्षाचे १२ अंक एकाच वेळी मिळाले. त्यावेळी त्यांनी केलेल्या खुलाशात माझे नाव त्यांच्या वर्गणीदारांच्या रजिस्टरमध्ये लिहिण्याचे राहून गेल्याचे त्यांनी कळविले. एकूण अमृतचा दर्जाच नव्हे तर पुरते प्रशासनच मला काहीसे कमी प्रतीचे वाटते. नाव वर्गणीदारांच्या यादीत एक पूर्ण वर्ष गेले तरी समाविष्ट न करणे, संपादकांच्या नावे पाठविलेल्या पावत्यांच्या छायाप्रती (एकाच कार्यालयात असूनही ) वितरण व्यवस्थापकांपर्यंत न जाणे, अशा काही बाबी जाणवल्या. माझा हा अनुभव १९९६ चा आहे. आताची परिस्थिती माहित नाही.
थोडक्यात, अमृत चालू आहे, पण व्यवहार मात्र त्यांना जमला नसावा.