लेख आवडला. शेवटची दोन कारणेही पटली.

साताऱ्याच्या घरात आम्ही एकेक खड्डा करून कचरा मुरवतो. एका खड्ड्यावर कचऱ्याचा डोंगर झाला, की दुसरा वापरू लागायचे; मग तो डोंगर हळूहळू खाली बसतो. मग, त्यातली माती फुलझाडांच्या कुंड्यांना, इतर फळझाडांना वगैरे वापरायची. मग तसेच दुसऱ्या डोंगराचे.. असे चक्र.

दोनेक आठवड्यांपूर्वी पुण्यात राहणारी माझी एक मैत्रिण 'फ्रूट अँड व्हेज डायेट' वर  गेली होती. तेव्हा पुष्कळ भाज्या आणि फळे खाऊन राहिलेली साले, टरफले टाकून देताना एकदा ती फोनवर म्हणाली प्रत्येक अपार्टमेंट कॉंप्लेक्सने पोहायचा तलाव वगैरे करण्यापेक्षा एकेक गोठा करायला पाहिजे. गाय नाहीतर बकरी पाळायची आणि भाज्यांची देठे, फळांची साले वगैरे तिला खाऊ घालायची. घरचे दूधदुभते आणि पुण्यही!
गोठा नाहीतर असे थोडे कांपोस्ट खड्डे आणि छोटी झाडे लावली तरी कचरा व्यवस्थापनात कितीतरी मदत होईल.