सतीशजी, हरिभक्तजी.
    नाथपंथीय रमताराम पूर्वी गांवोगांवी फिरत असत. दंडावर, पुढील हातावर, पोटावर काळ्या दोऱ्या बांधलेल्या, रुद्राक्षांच्या अनेक माळा अंगावर, हातात काळे लांबोळके भिक्षापात्र, भगव्या छाट्या, लांब केस, हातात चिमटा असा वेश करून दारी उभे राहून 'अल्लख निरंजन' म्हणून आरोळी देत. कुणी भिक्षा दिली की, पांढरी उदी कपाळी लावत असत व पुढे जात. त्यांच्या कमरेला एक घुंगरू लटकालेले असे. ते घुंगरू या मांडीवरून त्या मांडीवर घेत खुळखुळवत ते दारी उभे राहात. त्यांचे ते दर्शन लोभसवाणे दिसे. कवितेतला याचक फक्त तसे पाय हलवण्याची लकब असलेला होता, तो नाथपंथीय नव्हता.