मला असे वाटते की, या कथेतील 'मी'चे चित्रण अधिक व्यापक करता आले असते. पैसे नसल्याने शांताराम जेव्हा अडचणीत आला होता, त्यावेळी या 'मी'चे पुढे होणे, जे झाले होते ते बिल भरणे, त्यामुळे मन भरलेल्या शांतारामकडून सारी हकिगत  'मी'ला  समजणे आणि त्यातून 'मी'चे मायाळू पितृत्व अधिक उदात्त होणे अशा प्रकारच्या चित्रणातून वेगळा परिणाम साधता आला असता. कदाचित्, त्या प्रसंगी अनपेक्षितपणे 'मी'च्या पत्नीचे आगमनही दाखविता आले असते. चू. भू. दे. घे. क्षमस्व.