गोष्टीबद्दल तुम्हांला टोंचणी लागली आहे हें तुमच्या सुसंस्कारित संवेदनाशीलतेचें लक्षण आहे. परंतु कोणीही व्यक्ती कितीही अडचणींत असो, अनाहूत सल्ला न देणेंच श्रेयस्कर. त्यानें भीक मागितली आणि तुम्हीं सल्ला दिला. त्याचा त्याच्या परीनें अपेक्षाभंग झाला आणि अपेक्षाभंगाच्या निराशेतून तो सारासार विचार करूं शकला नाहीं. त्यातून तो बालिश, अननुभवी मुलगा. विचार कुठून करणार. पण त्यालाही तुमचा अवमान केल्याची टोचणी नक्की लागली असणार.
'यापुढें फुकटचे सल्ले नकोत हें' तुमचें योग्यच. वरील अभिप्रायही पटले.
तशी टोचणी फक्त आपल्याच सहभागातून लागते असें नाहीं. एकदां रस्त्यावर काम करणाऱ्या बाईकडे तिच्या चारपांच वर्षांच्या मुलीनें बाजूनें जाणाऱ्या फुगेवाल्याकडच्या बाहुलीचा हट्ट धरला. त्या बाईनें मुलीच्या पाठींत दोनचार धपाटे घातले. आणि ती मुलगी रडायला लागली. ही घटना मीं पाहिल्याला कित्येक वर्षें झालीं. पण त्या निष्पाप मुलीचा रडणारा चेहरा अजून माझ्या डोळ्यांसमोरून जात नाहीं.
जग आपल्याला वाटतें तसें सुंदर गोंडस नसतेंच. वय वाढलें तरी निबरता येत नाहीं हें आपलें दुर्दैव दुसरें काय?
सुधीर कांदळकर