रोज आहे भामट्याचे चालणे - गर्दीतले 
सत्तेपुढे लाचारीने - वाकणे वर्दीतले 

गुंडपुंडा खेटताना, पोसताना सोसतो -
अंतरीच्या वेदनांचे लोढणे वर्दीतले

'माल' गाठी बांधणे आहे तसे सोपे इथे 
'बार'पाशी फक्त थोडे थांबणे वर्दीतले

आजही धुंदावल्या डोळ्यात होते साजरे -
माणसाला हैवानाचे  ग्रासणे वर्दीतले

जाहले ते पुष्ट सारे, थांबले ना प्रत्यही -
कोडग्यांचे चिरीमिरी मागणे वर्दीतले