आतापर्यंत जालावर जे काही मराठी लिखाण मी वाचले आहे, त्यांत ह्या लेखाचा क्रम मी अगदी वर लावेन. सुरूवातीस खास चौकस शैलीः सिनीकल, पण भरपूर व अचूक निरीक्षणाची साक्ष देणारी (तें. च्या त्यांच्या मांजरीवरील लेखाची आठवण अपरिहार्यपणे झाली, दोन्ही लेख मात्र अगदी स्वतंत्र आहेत)-- आणि शेवट मात्र अगदी वेगळ्याच ढंगाचा, स्वतःची विमनस्क मनस्थिती प्रतिबिंबीत करणारा.