तुकारामाच्या गाथेतील अभंग क्रमांक १२७७-७८(खापरे.ऑर्ग) किंवा १२८२-८३(महाराष्ट्र सरकारी प्रत) असे आहेत :-
१२७७/१२८२
लाहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥ १ ॥
ऐरावत रत्न थोर । तया अंकुशाचा मार ॥ ध्रु ॥
ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥ २ ॥
तुका म्हणे ज़ाण । व्हावें लाहनाहुनी लाहन ॥ ३ ॥
१२७८/१२८३
नीचपण बरवें देवा । न चले कोणाचाही दावा ॥ १ ॥
महापुरें झाडें ज़ाती । तेथें लव्हाळे राहाती ।ध्रू ॥
येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरि ॥ २ ॥
तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥ ३ ॥
---अद्वैतुल्लाखान