हा समाज सुशिक्षित झाला खरा पण तो विज्ञानाभिमुख झाला नाही. रुढीला घाबरून जे आहे तसेच चालू ठेवणे असे बहुतांशी लोक करतात. प्रत्येक घटना वा कृती विज्ञानाच्या चांचणीवर उतरते की नाही हे बघायलाही धाडस लागते. ज्यांच्याकडे ते असते ते या फेऱ्यातून बाहेर पडतात. बाकीचे तसेच रुढीच्या चक्रात फिरत राहतात.
माणसाचे मन खंबीर असले तर दुःख विसरायला कुठल्याही कर्मकांडाची जरुर लागत नाही.